महाराष्ट्रातील मत्स्यपालन अधिक वैज्ञानिक करण्यासाठी नितेश राणे यांची आंध्र प्रदेशातील ॲक्वा लॅबला भेट

0
8
महाराष्ट्रातील मत्स्यपालन अधिक वैज्ञानिक करण्यासाठी नितेश राणे यांची आंध्र प्रदेशातील ॲक्वा लॅबला भेट
महाराष्ट्रातील मत्स्यपालन अधिक वैज्ञानिक करण्यासाठी नितेश राणे यांची आंध्र प्रदेशातील ॲक्वा लॅबला भेट
महाराष्ट्रातील मत्स्यपालन अधिक वैज्ञानिक करण्यासाठी नितेश राणे यांची आंध्र प्रदेशातील ॲक्वा लॅबला भेट

कोव्वाडा येथील आनंदा ॲडव्हान्स ॲक्वा लॅबमध्ये रोगनिदान, पाणी व माती परीक्षण आणि कोळंबीच्या आरोग्य व्यवस्थापनाचा घेतला आढावा

कोव्वाडा, आंध्र प्रदेश :
मत्स्यव्यवसाय अभ्यास दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंधारे मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशातील कोव्वाडा येथील आनंदा ॲडव्हान्स ॲक्वा लॅबच्या प्रादेशिक संशोधन व विश्लेषण प्रयोगशाळेला भेट दिली.

या भेटीदरम्यान मत्स्यपालनातील रोगनिदान, पाणी व मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण, कोळंबीच्या आरोग्याचे निरीक्षण आणि शास्त्रीय पद्धतीने मत्स्यपालन व्यवस्थापन याबाबत माहिती घेण्यात आली. यावेळी त्यांनी प्रयोगशाळेतील तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली.या चर्चेत रोगांचे निदान, सूक्ष्मजीवशास्त्रीय विश्लेषण, पाण्याच्या गुणवत्तेचे विविध निकष, जैवसुरक्षा आणि संभाव्य धोक्यांची वेळीच ओळख या महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय झाला. वेळेवर प्रयोगशाळा चाचण्या आणि वैज्ञानिक माहितीवर आधारित मार्गदर्शनामुळे मत्स्यपालकांना कोळंबी व माशांचे जगण्याचे प्रमाण वाढविणे, उत्पादनातील नुकसान टाळणे आणि उत्पादकता सुधारण्यासाठी कशी मदत होऊ शकते, याची माहिती या भेटीतून मिळाली.
महाराष्ट्रातील मत्स्यपालन क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक परीक्षण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. या अभ्यास दौऱ्यातून मिळालेले अनुभव राज्यातील मत्स्यपालनासाठी तांत्रिक मार्गदर्शन सेवा सक्षम करणे, रोगनिदान व परीक्षण सुविधांचा विस्तार करणे आणि मत्स्यव्यवसायाचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
या भेटीदरम्यान आनंदा समूहाचे अध्यक्ष यू. के. विश्वनाथ राजू, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खापले, मत्स्यव्यवसाय तज्ज्ञ मनोज शर्मा, अतिरिक्त आयुक्त महेश देवरे, नागनाथ भादुले यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here