हातात पाना-पक्कड, मनात सुरक्षिततेचा ध्यास! लालपरीला धावती ठेवणाऱ्या आजच्या नवदुर्गा

0
5

मुंबई सेंट्रल आगारातील दर्शना विनोद गवळी यांची अवजड यंत्रांशी झुंज; महिला मेकॅनिकच्या कर्तृत्वाला सलाम

मुंबई :
हातात पाना-पक्कड, हातांवर ग्रीस आणि मनात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा ध्यास… अशा जिद्दीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीला धावती ठेवण्यासाठी महिला मेकॅनिक अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या या कष्टांमुळे एसटीच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासात मोलाची भर पडत आहे.
मुंबई सेंट्रल आगारात कार्यरत असलेल्या दर्शना विनोद गवळी या त्यापैकीच एक. अवजड यंत्रांशी दोन हात करत एसटी बसची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामात त्या आपले कौशल्य पणाला लावतात. हाताला ग्रीस लागले तरी चालेल; मात्र एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा प्रवास सुरक्षित झाला पाहिजे, हीच त्यांची कामामागची प्रेरणा आहे.
एसटी रस्त्यावर धावताना प्रवाशांना तिच्या प्रवासाचा अनुभव दिसतो; मात्र त्या प्रवासामागे वाहनांची देखभाल करणाऱ्या मेकॅनिकचे परिश्रम अनेकदा पडद्याआड राहतात. पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात महिला मेकॅनिक आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
जिद्द, मेहनत आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर लालपरीला नवसंजीवनी देणाऱ्या दर्शना गवळी यांच्यासारख्या रणरागिणी खऱ्या अर्थाने आजच्या नवदुर्गा आहेत. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here