अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वी मिळणार २,००० रुपयांची भाऊबीज भेट

0
11

राज्यातील २ लाख १४ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी ४२.८१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई :
राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २,००० रुपये देण्यात येणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील एकूण २,१४,०९७ अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून पात्र कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट दिली जाणार आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल
गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here