संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीचा प्रश्न मार्गी लागणार

0
7
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीचा प्रश्न मार्गी लागणार
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीचा प्रश्न मार्गी लागणार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीचा प्रश्न मार्गी लागणार

सोसायटीधारकांना भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करण्याचे निर्देश; अर्ज मिळताच मोजणी व सर्वेक्षण सुरू करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आदेश

मुंबई :
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित सोसायटीधारकांनी भूमी अभिलेख विभागाकडे तातडीने रीतसर अर्ज दाखल करावेत, असे निर्देश गृह (शहरे) व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.
मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीत जमिनीच्या हद्द निश्चितीच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. संबंधित सोसायटीधारकांचे अर्ज प्राप्त होताच जागेची मोजणी आणि सर्वेक्षणाचे काम विलंब न लावता हाती घ्यावे, असे निर्देश राज्यमंत्री कदम यांनी भूमी अभिलेख विभागाला दिले.
स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन प्रक्रिया
जमिनीच्या हद्द निश्चितीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येईल. या प्रक्रियेत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
संबंधित नागरिकांचे सहकार्य घेऊन आवश्यक प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे सोसायटीधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह रीतसर अर्ज दाखल करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित
या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, महसूल विभागाच्या सहसचिव मनीषा जायभाये, पोलीस उपायुक्त (उत्तर विभाग-३) गजानन राजमाने, उपवनसंरक्षक किरण पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी नागनाथ रोहिले, नगरसेवक वैभव भरडकर यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here