ससून डॉकमधील मच्छीमारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक

0
12
ससून डॉकमधील मच्छीमारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक
ससून डॉकमधील मच्छीमारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक

ससून डॉकमधील मच्छीमारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई पोर्ट प्राधिकरणाची गोदामे शासननिर्धारित दराने उपलब्ध करून देण्यावर चर्चा; बर्फ कारखान्यांच्या प्रश्नांवरही सकारात्मक विचारविनिमय

मुंबई :
कुलाबा येथील ससून डॉक परिसरातील गोदामे, बर्फ कारखाने तसेच मच्छीमार बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली.
गोदामे शासननिर्धारित दराने उपलब्ध करून देण्यावर चर्चा
या बैठकीत मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडील (BPT) गोदामे शासननिर्धारित दरानुसार मच्छीमारांना उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच ससून डॉक परिसरातील बर्फ कारखान्यांसह मच्छीमार बांधवांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक विचारविनिमय झाला.
संबंधित विभागांना समन्वयाने कार्यवाहीच्या सूचना
मच्छीमारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. मच्छीमार बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
या बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here