कोकण रेल्वेकडून शूरवीरांच्या सन्मानार्थ ‘स्मृती दिवस’ साजरा
कोकण रेल्वेकडून शूरवीरांच्या सन्मानार्थ ‘स्मृती दिवस’ साजरा
समर्पण आणि बलिदानातून कोकण रेल्वेचा पाया मजबूत करणाऱ्या वीरांना आदरांजली
कोकण रेल्वेच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि आपल्या समर्पण व बलिदानाने या रेल्वेचा पाया मजबूत करणाऱ्या शूरवीरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे ‘स्मृती दिवस’ साजरा करण्यात येतो.
या दिवसाच्या माध्यमातून कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करून त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यांच्या समर्पणाचा आणि बलिदानाचा वारसा सदैव प्रेरणादायी राहील.