टोरेंट पॉवरच्या कारभाराविरोधात भिवंडीत संताप; खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना निवेदन

0
10
टोरेंट पॉवरच्या कारभाराविरोधात भिवंडीत संताप- खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना निवेदन
टोरेंट पॉवरच्या कारभाराविरोधात भिवंडीत संताप- खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना निवेदन

टोरेंट पॉवरच्या कारभाराविरोधात भिवंडीत संताप; खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना निवेदन

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘टोरेंट हटाव कृती समिती’ आक्रमक; योग्य पाठपुरावा करण्याचे खासदारांचे आश्वासन

भिवंडी :
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह टोरेंट पॉवर कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ‘टोरेंट हटाव कृती समिती, भिवंडी’च्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना नागरिकांच्या विविध समस्यांचा सविस्तर उल्लेख असलेले निवेदन सादर करण्यात आले.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये टोरेंट पॉवर कंपनीच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले. वीज ग्राहकांच्या अडचणी, त्यांच्या तक्रारी आणि न्याय्य मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांचे निराकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सर्वसामान्य नागरिकांना वीजसेवेसंदर्भातील समस्यांमधून दिलासा मिळावा आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी संबंधित प्रश्नांचा पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
जनतेच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कटिबद्ध असून, या प्रकरणी लवकरात लवकर योग्य तो पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here