ठाण्यात उन्नत रस्त्याच्या कामादरम्यान वाहनावर लोखंडी सांगाडा कोसळला; कंत्राटदाराला २ कोटींचा दंड

0
7

कोपरी पुलावरील दुर्घटनेत वाहनाच्या पुढील काचेचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही, एमएमआरडीएकडून चौकशीचे आदेश

ठाणे :
ठाण्यातील आनंद नगर–साकेत उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामादरम्यान कोपरी पुलावर एक दुर्दैवी घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या पियरचा लोखंडी सळ्यांचा सांगाडा (रिइन्फोर्समेंट केज) धावत्या कारवर कोसळल्याने वाहनाच्या पुढील काचेचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) संबंधित कंत्राटदार जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्यावर दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी तसेच बांधकामस्थळी सुरक्षेतील त्रुटी निश्चित करण्यासाठी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
घटनेत नुकसान झालेल्या वाहनाला घटनास्थळावरून हटवण्यात आले आहे. तसेच क्रेनच्या साहाय्याने कललेला लोखंडी सळ्यांचा सांगाडा सुरक्षितपणे काढण्याचे काम हाती घेण्यात आले. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक सुरक्षितता हे एमएमआरडीएचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व कंत्राटदारांनी बांधकामादरम्यान निर्धारित सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच प्रत्येक प्रकल्पस्थळी जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here