श्रीवर्धन तालुक्यात सप्टेंबर महिन्यासाठी ३,७४९ क्विंटल धान्य मंजूर; अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मिळणार लाभ
श्रीवर्धन तालुक्यात सप्टेंबर महिन्यासाठी ३,७४९.८० क्विंटल धान्य मंजूर; अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना लाभ
श्रीवर्धन l प्रतिनिधी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत श्रीवर्धन तालुक्यात सप्टेंबर महिन्यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांमधील पात्र लाभार्थ्यांसाठी एकूण ३,७४९.८० क्विंटल धान्य मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे.
तालुक्यात अंत्योदय योजनेंतर्गत २,२४० शिधापत्रिकाधारक, तर प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत ५९,३१६ लाभार्थी आहेत. या योजनांच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे निर्धारित प्रमाणात धान्य उपलब्ध करून दिले जाते.
संबंधित पात्र लाभार्थ्यांनी आपल्या रास्तभाव धान्य दुकानातून नियमानुसार निर्धारित प्रमाणात गहू व तांदळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.