एकता विष्णोई यांची जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णभरारी; तीन सुवर्णपदकांसह भारताचा गौरव

0
9

अमेरिकेतील नेवाडा येथे झालेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स क्लासिक अँड इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी एकता विष्णोई यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तीन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. त्यांच्या या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव वाढला आहे.
या स्पर्धेत एकता विष्णोई यांनी स्क्वॉट्स, डेडलिफ्ट आणि एकूण वजन या तीन प्रकारांत सुवर्णपदके जिंकली. त्यांनी एकूण ३६२.५ किलो वजन उचलत जपान आणि कॅनडाच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. विशेष म्हणजे, मास्टर्स-२ गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पॉवरलिफ्टर होण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे.
शासकीय सेवेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर यश संपादन करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. एकता विष्णोई यांनी आपल्या जिद्दीने, मेहनतीने आणि सातत्यपूर्ण सरावाने भारतीय महिलांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी एकता विष्णोई यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here