ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राने राजकारणाचा सखोल अभ्यासक गमावला - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राने राजकारणाचा सखोल अभ्यासक गमावला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई :
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास असलेला एक अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
प्रताप आसबे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण केले. राजकीय क्षेत्रातील विविध घडामोडींचा अभ्यासपूर्ण वेध घेत त्यांनी पत्रकारितेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि राजकीय विश्लेषण क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
त्यांच्या निधनाबद्दल शिंदे यांनी दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.