
नाशिकच्या गोदा महाआरतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद; ६५० गावांतील ६,२३३ आदिवासी बांधवांचा सहभाग
नाशिक :
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गौरव वाढवणारी अभिमानास्पद घटना नाशिक येथे घडली आहे. नाशिकच्या रामतीर्थावर ६५० गावांतील तब्बल ६ हजार २३३ आदिवासी बंधू-भगिनींनी एकत्र येत भक्तिभावाने सादर केलेल्या गोदा महाआरतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.


