आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्त्याच्या कामाचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन
लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्त्याच्या कामाचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन
लांजा :
लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच या मार्गावरील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होऊन स्थानिक ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
या भूमिपूजन समारंभाला मंडळ अध्यक्ष विराज हरमले, शैलेश खामकर, प्रभाकर टोले, प्रमोद कुरुप, शेखर सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.