भांडुपच्या स्मित लोकेचे बुद्धिबळ स्पर्धेत निर्विवाद यश; ८ वर्षांखालील गटात पटकावले विजेतेपद

0
12

पाचही फेऱ्यांत विजय मिळवत ५ पैकी ५ गुणांची कमाई; २५० हून अधिक खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग

मुंबई (विश्वनाथ पंडित) :
भांडुप येथील धनश्री चेस अकॅडमीच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत बाल बुद्धिबळपटू स्मित लोके याने ८ वर्षांखालील वयोगटाचे विजेतेपद पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष म्हणजे, स्मितने स्पर्धेतील पाचही फेऱ्यांमध्ये विजय मिळवत ५ पैकी ५ गुणांची कमाई केली आणि निर्विवाद विजेतेपदावर आपले नाव कोरले.
मुंबई सिटी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या (MCDCA) अंतर्गत आयोजित या स्पर्धेत २५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. राम शिंदे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेतील विजेत्यांना चषक, पदके आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभाला डॉ. रवींद्र घुले, संदीप के. अहेर, सुधीर बांदेलकर, स्नेहल गायकर, प्रेम पंडित, शशांक पितळे आणि सरवणन ई. यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
स्मित लोके याच्या या यशामागे भांडुप येथील धनश्री चेस अकॅडमीचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. अकॅडमीचे प्रशिक्षक प्रेम पंडित (आंतरराष्ट्रीय लवाद व राष्ट्रीय शिक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली स्मितने बुद्धिबळातील डावपेच, रणनीती आणि खेळातील संयम यांवर विशेष मेहनत घेतली.
स्मितच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बुद्धिबळ क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here