रायगड पोलिसांची तत्परता; साडेचार लाखांचे ११ लॅपटॉप सुरक्षितपणे परत

0
12
रायगड पोलिसांची तत्परता; साडेचार लाखांचे ११ लॅपटॉप सुरक्षितपणे परत
रायगड पोलिसांची तत्परता; साडेचार लाखांचे ११ लॅपटॉप सुरक्षितपणे परत

रायगड पोलिसांची तत्परता; साडेचार लाखांचे ११ लॅपटॉप सुरक्षितपणे परत

रायगड :
पोलिसांच्या सतर्कतेमुळे रस्त्यावर पडलेल्या पार्सल बॉक्समधील सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे ११ लॅपटॉप सुरक्षितपणे संबंधितांच्या ताब्यात देण्यात आले. रायगड पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.
दि. २ नोव्हेंबर रोजी जांभूळपाडा दूरक्षेत्राच्या हद्दीत पाली-खोपोली मार्गावर पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना गोंदव फाटा येथे रस्त्याच्या कडेला एक पार्सल बॉक्स पडलेला आढळला. पोलिसांनी हा बॉक्स ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये Acer कंपनीचे ११ लॅपटॉप असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी बॉक्सवरील बिलावरील तपशीलाच्या आधारे संबंधितांशी संपर्क साधला. चौकशी व खात्री केल्यानंतर हे पार्सल कुरिअर वाहनातून प्रवासादरम्यान खाली पडल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर आवश्यक खात्री करून सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सर्व ११ लॅपटॉप सुरक्षितपणे संबंधितांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
रायगड पोलिसांनी दाखविलेली सतर्कता, प्रामाणिकपणा आणि तत्परता यामुळे महागडे साहित्य सुरक्षितपणे परत मिळाले असून, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here