रायगडमधील सुपारी बागायतदारांना कीड व रोग व्यवस्थापनाचे तांत्रिक मार्गदर्शन

0
11

अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी सुपारी बागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. आक्शी (ता. अलिबाग) आणि नांदगाव (ता. मुरूड) येथील सुपारी बागायतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
रायगडमधील सुपारी बागायतदारांना कीड व रोग व्यवस्थापनाचे तांत्रिक मार्गदर्शन
रायगडमधील सुपारी बागायतदारांना कीड व रोग व्यवस्थापनाचे तांत्रिक मार्गदर्शन
४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा मासिक चर्चासत्रात उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संचालक (विस्तार शिक्षण) यांच्या सूचनेनुसार कृषी विज्ञान केंद्र, रोहा येथील विषय विशेषज्ञ डॉ. जीवन आरेकर आणि श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सिद्धेश सावंत यांनी संयुक्तपणे सुपारी बागांची पाहणी केली.
यावेळी सुपारी पिकावरील विविध कीड व रोगांची लक्षणे, त्यांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बागायतदारांच्या अडचणी व शंकांचे निरसन करून सुपारी पिकाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here