वसुबारस निमित्त चित्रलेखा नृपाल पाटील यांच्याकडून गोमातेचे पूजन; नागरिकांना दिल्या शुभेच्छा
वसुबारस निमित्त चित्रलेखा नृपाल पाटील यांच्याकडून गोमातेचे पूजन; नागरिकांना दिल्या शुभेच्छा
रायगड :
दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात करणाऱ्या वसुबारस सणानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा नृपाल पाटील यांनी आपल्या घरी गोमातेचे विधिवत पूजन केले. यावेळी त्यांनी गोमातेचे आशीर्वाद घेत सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
भारतीय संस्कृतीत गोमातेला मातेचे स्थान असून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा वसुबारस या सणातून जपली जाते. या पवित्र परंपरेचे पालन करत चित्रलेखा पाटील यांनी गोमातेचे पूजन करून सण साजरा केला. वसुबारसच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.