लक्ष्मण (राजू) रावराणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; गावठी वैद्य, सर्पमित्रांचा सन्मान

0
12

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वैभववाडी :
वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक आणि शैक्षणिक परंपरा जपत वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण (राजू) रावराणे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले.

या उपक्रमांतर्गत कुर्ली खडकदारा येथील गावठी वैद्य बाळकृष्ण शंकर डवुर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने आरोग्यसेवा देणाऱ्या तालुक्यातील अन्य गावठी वैद्य तसेच सर्पमित्रांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
याशिवाय रावराणे यांनी तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप केले. वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी विविध भाषांमधून शुभेच्छा देत रावराणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here