दहावी-बारावी फॉर्म १७ मुदतवाढ २०२६; खासगी विद्यार्थ्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी

0
8
दहावी-बारावी फॉर्म १७ मुदतवाढ २०२६; खासगी विद्यार्थ्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी
दहावी-बारावी फॉर्म १७ मुदतवाढ २०२६; खासगी विद्यार्थ्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी

दहावी-बारावी फॉर्म १७ मुदतवाढ २०२६; खासगी विद्यार्थ्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी

रत्नागिरी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेस खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ‘फॉर्म क्रमांक १७’ भरून नावनोंदणी करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी ही माहिती दिली असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र आणि बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या नियम व अटींनुसार सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये नावनोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती आणि मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
खासगी विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या नावनोंदणीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावयाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरताना शाळा सोडल्याचा मूळ दाखला (तो उपलब्ध नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र), आधार कार्ड आणि स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन नावनोंदणी अर्ज आणि शुल्क भरल्यानंतर अर्जाची मूळ प्रत, शुल्क भरल्याच्या पोहोचपावतीच्या दोन छायाप्रती तसेच आवश्यक मूळ कागदपत्रे अर्जात नमूद केलेल्या संबंधित शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावी लागतील.
३० नोव्हेंबरपर्यंत परीक्षेचे मुख्य आवेदनपत्र भरणे आवश्यक
नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत नियमित परीक्षा शुल्कासह परीक्षेचे मुख्य आवेदनपत्र भरणे बंधनकारक आहे. त्यानंतर छाननीसाठी जमा केलेली मूळ कागदपत्रे संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून परत घ्यावीत.
फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करण्याची ही अंतिम संधी आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी कोकण विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here