वृद्धाश्रमांतील ज्येष्ठांसह महिला, पुरुषांची दिवाळी झाली गोड
वृद्धाश्रमांतील ज्येष्ठांसह महिला, पुरुषांची दिवाळी झाली गोड
दिविजा, संविता आश्रमाला कलमठ ग्रामस्थांकडून फराळ, जीवनावश्यक वस्तू सुपूर्द
कणकवली :
दिविजा वृद्धाश्रम व संविता आश्रमातील वृद्धांसह महिला, पुरुषांची दिवाळी गोड करण्यासाठी कलमठ बाजारपेठेतील ग्रामस्थांना दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तु देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहानाला ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत फराळ व जीवनावश्यक वस्तू जमा केला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री नेतृत्वाखाली टीमने दोन्ही आश्रमांच्या व्यवस्थापक मंडळींकडे सुपूर्द करण्यात आल्या. तसेच आश्रमांना आर्थिक मदतही देण्यात आली.
यंदाच्या दिवाळीत आपल्या घरातील फराळ, प्रेम आणि मायेचा गोडवा वृद्धाश्रमातील आजी, आजोबांपर्यंत महिला व पुरुषांना पोहोचवूय या टॅगलाईनखाली व्हॉट्सअॅप ग्रुपवर बाजारपेठेतील काही समाजाप्रति संवेदनशील असलेल्या व्यक्तींनी आवाहन केले होते. या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद घेत दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तू दिल्या. या वस्तुंचे शनिवारी ७ नोव्हेंबरला एकत्रित करून कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांच्या समन्वयातून टीमने असलदेतील दिविजा आश्रमाच्या व्यवस्थापन मंडळींकडे सुपूर्द केल्या. यावेळी आश्रमाचे व्यवस्थापक संजय शेटये यांनी आश्रमातील वृद्धांची संगोपन कशाप्रकारे केले जाते याची माहिती दिली. तसेच आजी-आजोबांच्या चेहºयांवर हास्य फुलविण्यासाठी विविध उपक्रमांसह हिंदू धर्मातील सण, उत्सव साजरे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. फराळ व जीवनावश्यक वस्तु दिल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
पणदूर येथील दिविजा आश्रमातील निराधारांना देण्ण्यासाठी जमा करण्यात आलेला फराळ व जीवनावश्यक वस्तु संविता आश्रमाच्या व्यवस्थापक मंडळींकडे सुपूर्द करण्यात आला. आश्रमांना फराळ व जीवनावश्यक वस्तू सुपूर्द करतेवेळी कलमठचे ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री, सूर्यकांत हुन्नरे, पत्रकार तुषार हजारे, नितीन उर्फ आबा मेस्त्री, भूषण ठाकूर, सिद्धेश घाडीगावकर, प्रसाद मठकर, निखिल हजारे, राहुल कडुलकर, राज सावंत, नील लोकरे, निश्चिय हुन्नरे आदी उपस्थित होते.
फराळ संकलनासाठी प्रेरणा हजारे, राणी हजारे, भूषण ठाकूर, नितीन उर्फ आबा मेस्त्री, निश्चय हुन्नरे, शुभ्रा घाडीगावकर, स्वरा गावडे व स्वामी समर्थ संघ, कलमठ यांनी मेहनत घेतली. दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नसून प्रेम, माणुसकी आणि आपुलकीचा प्रकाश इतरांच्या आयुष्यात पोहोचविण्याचा सण आहे, हे कलमठ ग्रामस्थांनी कृतीतून दाखवून दिले.