ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे पुरस्कार जाहीर; सिंगापूर ग्रामपंचायतीला ५० लाखांचे प्रथम पारितोषिक

0
5
ठाणे जिल्हा उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार २०२५-२६ जाहीर; सिंगापूर ग्रामपंचायतीला ५० लाखांचे बक्षीस
ठाणे जिल्हा उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार २०२५-२६ जाहीर; सिंगापूर ग्रामपंचायतीला ५० लाखांचे बक्षीस

ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे पुरस्कार जाहीर; सिंगापूर ग्रामपंचायतीला ५० लाखांचे प्रथम पारितोषिक

ठाणे :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत मुरबाड तालुक्यातील सिंगापूर ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे.
या अभियानांतर्गत जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये भिवंडी तालुक्यातील डोहोळे ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवला असून, या ग्रामपंचायतीला ३० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. तर मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवत २० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे :
  • प्रथम क्रमांक : सिंगापूर, ता. मुरबाड – ५० लाख रुपये.

  • द्वितीय क्रमांक : डोहोळे, ता. भिवंडी – ३० लाख रुपये.

  • तृतीय क्रमांक : फांगुळगव्हाण, ता. मुरबाड – २० लाख रुपये.

ग्रामविकासासाठी लोकसहभाग, उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी कामकाजाच्या माध्यमातून या तिन्ही ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे ठाणे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनाही विकासकामांसाठी प्रेरणा मिळणार आहे. पुरस्कारप्राप्त तिन्ही ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here