सोमेश्वर साखर कारखान्याला सुनेत्रा अजित पवार यांची भेट; नव्या हार्वेस्टर मशीनचा शुभारंभ

0
13
सोमेश्वर साखर कारखान्याला सुनेत्रा अजित पवार यांची भेट; नव्या हार्वेस्टर मशीनचा शुभारंभ
सोमेश्वर साखर कारखान्याला सुनेत्रा अजित पवार यांची भेट; नव्या हार्वेस्टर मशीनचा शुभारंभ

सोमेश्वर साखर कारखान्याला सुनेत्रा अजित पवार यांची भेट; नव्या हार्वेस्टर मशीनचा शुभारंभ

बारामती :
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन नवनिर्वाचित संचालक मंडळाशी संवाद साधला. यावेळी कारखान्याच्या पुढील वाटचालीसह सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच कारखान्यात नव्याने दाखल झालेल्या हार्वेस्टर मशीनचे पूजन करून त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवत निर्विवाद यश संपादन केले आहे. या यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले.
कारखान्याची प्रगती, सहकार क्षेत्रातील जबाबदारी आणि सभासदांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्याच्या दृष्टीने आगामी काळात राबवायच्या विविध कामांबाबत यावेळी चर्चा झाली. कारखान्याची कार्यक्षमता वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
ऊसतोडणी प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी नव्याने दाखल झालेले हार्वेस्टर मशीन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या यंत्रामुळे शेतीच्या यांत्रिकीकरणाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहावी आणि नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या माध्यमातून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य घडावे, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here