लसीकरणापेक्षा कोरोना चाचण्या महत्वाच्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
182

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक घेतली. कोरोनाने पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, आपल्याला यावर लक्ष्य देण्याची गरज आहे. आता मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष्य द्यावे लागेल. यावर सरकारला जास्त मेहनत घ्यावी लागेल.’मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष्य द्या, लसीकरणापेक्षा कोरोना चाचण्या महत्वाच्या असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी सांगितले.या बैठकीला पंतप्रधानांसोबत यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि इतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.मोदी पुढे म्हणाले, मी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, तुम्ही मशीनरीद्वारे सर्व्हे करा. आधी कोरोनाच्या हलक्या लक्षाणांनाही लोक घाबरायचे. पण, आता लोक या लक्षणांना घाबरत नाहीयेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, आता कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्यामुळे अनेकांमध्ये लक्षणेच दिसत नाहीयेत. यासाठी टेस्टिंग गरजेची आहे. आता सर्व सरकारांनी व्हॅक्सीनपेक्षा टेस्टिंगवर भर द्यावी.11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले आणि 14 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले आणि 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यादरम्यान आपण लसीकरण उत्सव साजरा करायला हवा. एक अभियान चालवून जास्तीत-जास्त लोकांना लस दिली जावी.एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यादरम्यान आपण लसीकरण उत्सव साजरा करायला हवा. एक अभियान चालवून जास्तीत-जास्त लोकांना लस दिली जावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here