मुंबईच्या महापौर जीतू तावडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीपावलीच्या शुभेच्छा
मुंबई :
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त मुंबईच्या महापौर जीतू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
दीपावलीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या भेटीत सणाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. आनंद, उत्साह आणि मांगल्याचा संदेश देणाऱ्या दीपावलीनिमित्त महापौर जीतू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.