दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी २६ लाखांची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धनादेश सुपूर्द 

0
13

मुंबई :
राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि कष्टकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २६ लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार मंदाताई म्हात्रे आणि जिल्हा मंत्री निलेशजी म्हात्रे यांनी सामाजिक बांधिलकी जपत या मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
यावेळी गोवर्धनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने २१ लाख रुपये, तर भगवती इंजिनिअरिंग कंपनीच्या वतीने ५ लाख रुपये असे एकूण २६ लाख रुपयांचे योगदान देण्यात आले.
महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट लवकर दूर व्हावे आणि शेतकरी तसेच कष्टकरी बांधवांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धीचे दिवस यावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here