शहापूरमधील दुष्काळसदृश परिस्थितीची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून पाहणी
नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
शहापूर :
दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ढाढरे ग्रामपंचायत हद्दीतील खालपाटवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.



