‘मालवणी अभिमान मेळो २०२६’साठी शासनाकडून १० लाखांचा निधी मंजूर; सिंधुदुर्गात सांस्कृतिक महोत्सव

0
7
‘मालवणी अभिमान मेळो २०२६’साठी शासनाकडून १० लाखांचा निधी मंजूर
‘मालवणी अभिमान मेळो २०२६’साठी शासनाकडून १० लाखांचा निधी मंजूर

‘मालवणी अभिमान मेळो २०२६’साठी शासनाकडून १० लाखांचा निधी मंजूर; सिंधुदुर्गात सांस्कृतिक महोत्सव

मालवणी संस्कृती, कला आणि परंपरेच्या जतन व संवर्धनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय

सिंधुदुर्ग :
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘मालवणी अभिमान मेळो २०२६’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी शासनाकडून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मालवणी भाषा, लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागाने यापूर्वीच ‘मालवणी अभिमान मेळो २०२६’ आयोजित करण्यास मान्यता दिली होती. आता या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने कार्यक्रमाच्या तयारीला गती मिळणार आहे.
या सांस्कृतिक मेळाव्याच्या माध्यमातून मालवणी संस्कृतीचा गौरव करण्याबरोबरच स्थानिक कलाकार आणि सांस्कृतिक परंपरांना व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here