भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास; पुरुष हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक!

0
112

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये झोकात प्रवेश केला आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या क्वार्टर फायनल लढतीत हिंदुस्थानने ग्रेट ब्रिटनचा 3-1 असा दणदणीत पराभव केला. या विजयासह तब्बल चार दशकानंतर पुरुष हॉकी संघ सेमीफायनलला पोहोचला आहे. सेमीफायनलमध्ये भारतीय हॉकी संघा चा सामना बेल्झियमच्या संघाशी होणार आहे.

संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवले. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. तो भारतीय डिफेंडरांनी नाकाम केला. यानंतर 7 व्या मिनिटाला सिमरनजीत सिंहच्या चांगल्या पासवर दिलप्रीतने गोल केला. दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या मिनिटाला गुरजंत सिंहने काउंटर अटॅकमध्ये जबरदस्त गोल केला. या गोलमुळे भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली होती. हाफ टाईमपर्यंत स्कोअर सारखाच राहिला.

ग्रेट ब्रिटनने तिसऱ्या तिमाहीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. सॅम वार्डने या क्वार्टरच्या 45 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. यामुळे स्कोअर 2-1 असा झाला. शेवटच्या तिमाहीत ग्रेट ब्रिटननेही काउंटर अटॅक केला. भारतीय गोलकीपर आणि माजी कर्णधार पीआर श्रीजेशने उत्कृष्ट सेव्ह केले आणि ब्रिटनला परत येण्याची संधी दिली नाही.

कर्णधार मनप्रीत सिंहला 54 व्या मिनिटाला अंपायरने यलो कार्ड दाखवले. यानंतर संघ 10 खेळाडूंसह 5 मिनिटे खेळत होता. या दरम्यान, 57 व्या मिनिटाला 10 खेळाडूंसह खेळणाऱ्या टीम इंडियाने शानदार काउंटर अटॅक केला आणि हार्दिक सिंहने मैदानी गोल करून भारताला 3-1 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here