उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी भवनात नागरिकांशी साधला संवाद; विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना

0
14

मुंबई / प्रतिनिधी :
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या मतदारसंघांतील स्थानिक प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

राज्याच्या विविध भागांतून मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आलेल्या नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या. शासकीय कामकाजातून वेळ काढून यावेळी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या मतदारसंघांतील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान उपस्थितांनी आपल्या मतदारसंघांतील स्थानिक समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, प्रलंबित विकासकामे तसेच विविध सार्वजनिक प्रश्नांकडे लक्ष वेधले. प्रत्येकाचे म्हणणे समजून घेत संबंधित विषयांची माहिती घेण्यात आली.
नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि विकासकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, यावर यावेळी भर देण्यात आला.
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा आणि संबंधित यंत्रणेमार्फत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here