वाशी येथे १९ नोव्हेंबरला वनमंत्री गणेश नाईक यांचा ‘जनता दरबार’
वाशी येथे १९ नोव्हेंबरला वनमंत्री गणेश नाईक यांचा ‘जनता दरबार’
नागरिकांना समस्या मांडण्याची संधी
प्रशासकीय कामांसंदर्भातील तक्रारी व समस्या निवेदनाद्वारे सादर करण्याचे आवाहन
वाशी :
नागरिकांच्या प्रशासकीय कामांसंदर्भातील समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य कार्यवाही करण्याच्या उद्देशाने गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गणेश नाईक यांच्या उपस्थितीत ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे.
हा जनता दरबार सकाळी १० वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे. प्रशासनाशी संबंधित विविध समस्या, तक्रारी किंवा प्रलंबित कामे असलेल्या नागरिकांना या जनता दरबारात आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.
संबंधित नागरिकांनी आपल्या समस्यांचे स्वरूप स्पष्ट करणारे लेखी निवेदन तयार करून जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.