गोकुळचे नवनियुक्त अध्यक्ष राजेश पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट
गोकुळचे नवनियुक्त अध्यक्ष राजेश पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट
संचालक मंडळातील सदस्यांसह मंत्रालयात भेट; एकनाथ शिंदे यांनी दिल्या भावी वाटचालीस शुभेच्छा
मुंबई :
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे नवनियुक्त अध्यक्ष राजेश पाटील आणि संचालक मंडळातील नवनियुक्त सदस्यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश पाटील आणि नवनियुक्त संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी आणि दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी कार्य करताना त्यांच्या पुढील वाटचालीस यश लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या भेटीप्रसंगी गोकुळच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.