रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या दुर्मीळ ब्लॅक पॅंथरच्या पिल्लाला जीवदान; वनविभागाच्या रेस्क्यू टीमचे उदय सामंतांकडून कौतुक

0
8

 महिला वनाधिकाऱ्यांच्या धाडसी नेतृत्वाचे केले अभिनंदन

रत्नागिरी :
विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पॅंथर) पिल्लाला रत्नागिरी वनविभागाच्या पथकाने धाडसाने आणि कौशल्यपूर्ण प्रयत्नांतून सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. या यशस्वी बचाव मोहिमेनंतर राज्याचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पळूण येथील वनविभागाच्या कार्यालयाला भेट देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
 महिला वनाधिकाऱ्यांच्या धाडसी नेतृत्वाचे केले अभिनंदन
महिला वनाधिकाऱ्यांच्या धाडसी नेतृत्वाचे केले अभिनंदन
यावेळी चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वन अधिकारी प्रियांका लगड आदी उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी वनविभागाच्या तत्परतेचे आणि बचाव पथकाच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
ते म्हणाले की, ब्लॅक पॅंथर हा अत्यंत दुर्मीळ वन्यप्राणी असून त्याचे अस्तित्व फार कमी ठिकाणी आढळते. गेल्या तीन-चार महिन्यांत जिल्ह्यात अशा प्रकारे ब्लॅक पॅंथर आढळण्याची आणि वनविभागाने त्याला सुखरूप वाचवण्याची ही दुसरी घटना आहे. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने केलेल्या कामगिरीवरून तिची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
जिल्ह्यातील महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचेही त्यांनी कौतुक केले. जिल्ह्यातील प्रमुख वनाधिकारी महिला असून त्या अत्यंत सक्षमपणे आणि धाडसाने वन्यप्राण्यांच्या बचाव मोहिमा हाताळत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा धाडसी कामगिरीबद्दल संबंधित महिला अधिकारी आणि संपूर्ण पथकाचे कौतुक करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
या बचाव मोहिमेदरम्यान काळ्या बिबट्याच्या पिल्लाने कोणत्याही नागरिकाला किंवा वनविभागाच्या कर्मचाऱ्याला इजा केली नाही. तसेच वनविभागाच्या पथकानेही त्याला कोणतीही हानी न पोहोचवता सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढले. या संवेदनशील आणि कौशल्यपूर्ण मोहिमेबद्दल पालकमंत्र्यांनी संपूर्ण वनविभागाचे आभार मानले.
या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या पिल्लाच्या बचावाची घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून त्याला पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here