हाहाकारानंतर रत्नागिरी पोलीसानी पोलीस मित्र आणि रत्नागिरी आर्मी यांच्या १०० हुन अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने रोगांचा प्रसार रोखण्यासाठी चिपळूण मधील रस्त्यांवरील चिखल,रस्ता साफ केला .तसेच वाहतुकीलाही सुरु करण्यासाठी मदत केली.
यामध्ये SDPO वाघमारे,SDPO बारी,पो.नि.पोळ,पो.नि.लाड,पो.नि चौधरी, स.पो.नि.ढेरे यांनी समन्वय साधला.
चिपळूण येथे रात्री उशिरापर्यंत फरशी तिठा ते गुहागर बायपास मार्गे एकेरी वाहतूक नियमन करण्यात आले तसेच पोलीसांमार्फत सुमारे 80 (मालवाहतुक ट्रक,आयशर, टँकर) सारख्या वाहनांना रस्ता वाहतुकीस खुला करून देण्यात आला.