रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमध्ये १२० नवीन पदांच्या मंजुरीचे वृत्त निराधार; शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

0
13

रत्नागिरी :
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १२० शिक्षक व कर्मचाऱ्यांची नवीन पदे मंजूर झाल्याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त वस्तुस्थितीशी सुसंगत नसून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे. अशा प्रकारची कोणतीही पदमंजुरी शासनाकडून करण्यात आलेली नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांसाठी ४५ विशेष शिक्षक, २५ कलाशिक्षक, २५ क्रीडा शिक्षक आणि २५ संगणक सहाय्यक अशी एकूण १२० नवीन पदे मंजूर करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, या वृत्ताचे शिक्षण विभागाने खंडन केले आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या पदमंजुरीसंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून अद्याप कोणतेही परिपत्रक किंवा शासन निर्णय (जीआर) निर्गमित करण्यात आलेला नाही. तसेच विशेष शिक्षक पदांना मंजुरी देणे किंवा कलाशिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक सहाय्यक यांची नवीन पदनिर्मिती करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना अथवा आदेश प्राप्त झालेले नाहीत.
त्यामुळे १२० नवीन पदे मंजूर झाल्याचे वृत्त तथ्यहीन असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पालक, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार आणि नागरिकांनी अशा वृत्तांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी मनिषा जगदाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here