चरी येथे शेतकरी कामगार पक्षाचा ९३ वा वर्धापन दिन २७ नोव्हेंबरला

0
7
चरी येथे शेतकरी कामगार पक्षाचा ९३ वा वर्धापन दिन २७ नोव्हेंबरला
चरी येथे शेतकरी कामगार पक्षाचा ९३ वा वर्धापन दिन २७ नोव्हेंबरला

चरी येथे शेतकरी कामगार पक्षाचा ९३ वा वर्धापन दिन २७ नोव्हेंबरला

भाई जयंत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; ऐतिहासिक शेतकरी संपातील संघर्ष आणि योगदानाला अभिवादन

चरी, प्रतिनिधी :
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वर्गीय नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरी येथे झालेला ऐतिहासिक शेतकरी संप हा महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीतील महत्त्वपूर्ण अध्याय मानला जातो. या ऐतिहासिक लढ्याला यंदा ९३ वर्षे पूर्ण होत असून, त्याचा ९३ वा वर्धापन दिन शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी चरी येथे उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार भाई जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक संपात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या त्याग, संघर्ष आणि योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच या लढ्याचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही करण्यात येणार आहे.
“इतिहास केवळ आठवायचा नसतो, तर तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असतो,” या भावनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा नृपाल पाटील यांनी ही माहिती दिली.
यावेळी शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत, गोरखनाथ पाटील, रविंद्र पाटील, प्रशांत पाटील, मंगेश पाटील, किरण पाटील, प्रा. डॉ. पराग पाटील, युवा नेते अभिषेक पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here