भारतीय महिला हॉकी संघ प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरीत तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव केला.
भारत – ऑस्ट्रेलियात दोन क्वार्टरचा खेळ झाला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांनी गोल करण्याची 1-1 संधी गमावली. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या फॉरवर्ड खेळाडूने भारतीय गोलवर हल्ला चढवला.
पण भारतीय डिफेंडर्स समोर त्यांचे काहीच चालले नाही. भारताने खेळाच्या 9 व्या मिनिटाला एक गोल तयार केला होता, पण राणी रामपाल चूकली. वंदना कटारियाच्या पासवर राणीने स्ट्रोक घेतला, पण चेंडू गोलपोस्टमधून गेला.
भारतीय संघाने 1980 मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. मात्र, तेव्हा उपांत्य फेरीचे स्वरूप नव्हते. ग्रुप स्टेजनंतर, सर्वाधिक गुण असलेले 2 संघ थेट अंतिम फेरीत खेळले होते. भारतीय संघ पूलमध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता.