CMAT २०२७ अर्ज प्रक्रिया सुरू; २० डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा, ११ फेब्रुवारीला परीक्षा
CMAT २०२७ अर्ज प्रक्रिया सुरू; २० डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा, ११ फेब्रुवारीला परीक्षा
नवी दिल्ली :
व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट (CMAT) २०२७ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत (NTA) घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना २० नोव्हेंबरऐवजी २० डिसेंबर २०२६ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
CMAT २०२७ ही परीक्षा ११ फेब्रुवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.
इच्छुक उमेदवारांनी निर्धारित मुदतीत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहिती मिळविण्यासाठी cmat.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.