मुंबईत २५ नोव्हेंबरला ‘स्वराज्याचा सागरध्वज’ भव्य सांस्कृतिक सोहळा
सिंधुदुर्ग किल्ला पायाभरणी दिनानिमित्त आज मुंबईत ‘स्वराज्याचा सागरध्वज’ सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई, दि. २५ नोव्हेंबर :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या सागरी सामर्थ्याची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण जागविण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला पायाभरणी दिनानिमित्त आज, बुधवार २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात ‘स्वराज्याचा सागरध्वज’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईत २५ नोव्हेंबरला ‘स्वराज्याचा सागरध्वज’ भव्य सांस्कृतिक सोहळा
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमाची संकल्पना प्रमोद जठार यांची असून, कोकण विकास आघाडी, मुंबईचे सुहास अडीवरेकर हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत.
या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी सामर्थ्य, आरमार उभारणीमागील दूरदृष्टी, सिंधुदुर्ग किल्ल्याची ऐतिहासिक निर्मिती आणि स्वराज्याच्या पराक्रमाची गाथा संगीत व सांस्कृतिक सादरीकरणातून उलगडण्यात येणार आहे.
या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध गायक नंदेश उमप, केतकी भावे जोशी, स्वरा जोशी, नचिकेत देसाई, जितेंद्र तुपे आणि विद्या करलगीकर आपली कला सादर करणार आहेत. त्यामुळे इतिहास, संगीत आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा अनोखा अनुभव रसिकांना घेता येणार आहे.
या सांस्कृतिक उपक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. लोकसहभागातून दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी संकलित केली जाणार आहे. ऐतिहासिक वारशाचा गौरव,