CPTP-12 प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना रत्नागिरी पोलीस दलाकडून मार्गदर्शन

0
12

रत्नागिरी :
एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम २०२६ (CPTP-12) अंतर्गत महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यावर आलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची कार्यपद्धती, पोलीस प्रशासनाचे कामकाज आणि विविध प्रशासकीय बाबींविषयी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना रत्नागिरी पोलीस दलाच्या कार्यपद्धतीची आणि स्थानिक स्तरावरील पोलीस प्रशासनाच्या कामकाजाची माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here