जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त रोहा येथे विक्रेत्यांना उष्णतारोधक पिशव्यांचे वाटप

0
12
जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त रोहा येथे विक्रेत्यांना उष्णतारोधक पिशव्यांचे वाटप
जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त रोहा येथे विक्रेत्यांना उष्णतारोधक पिशव्यांचे वाटप

जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त रोहा येथे विक्रेत्यांना उष्णतारोधक पिशव्यांचे वाटप

मासे सेवन वाढवण्यासाठी जनजागृती

रोहा, रायगड :
देशांतर्गत मासे सेवनाचे प्रमाण वाढविणे आणि माशांची सुरक्षित हाताळणी, वाहतूक व साठवणुकीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, किल्ला-रोहा, रायगड यांच्या वतीने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष उपक्रम राबविण्यात आला. जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त आयोजित या उपक्रमात स्थानिक मासे विक्रेत्यांना जनजागृतीपर घोषवाक्यांचे पोस्टर्स आणि भित्तीपत्रके वितरित करण्यात आली.

कृषी विज्ञान केंद्र, रोहा येथील प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मनोज तलाठी यांच्या हस्ते मासे विक्रेत्यांना उष्णतारोधक माशांच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मत्स्य आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या. स्थानिक पातळीवर मासे सेवनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच ग्राहकांमध्ये मत्स्य आहाराविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
कृषी विज्ञान केंद्राचे मत्स्यशास्त्र विषय विशेषज्ञ माधव गित्ते यांनी मासे हाताळताना घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व तसेच माशांची वाहतूक आणि साठवणूक करताना शीतसाखळी कायम राखण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले. माशांची गुणवत्ता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी योग्य हाताळणी व तापमान नियंत्रण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सचिन कार्ले (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) आणि सुरेश म्हादलेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी त्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here