माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी २७ नोव्हेंबरला रत्नागिरीत जिल्हास्तरीय समितीची बैठक

0
11

रत्नागिरी :
माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना आवश्यक संरक्षण आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्हास्तरीय संरक्षण समितीच्या मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे ही बैठक होणार आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासंदर्भातील तक्रारी आणि अडचणींवर चर्चा करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या माजी सैनिकांना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत काही तक्रारी किंवा समस्या असतील, त्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपली बाजू मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित तक्रारदारांनी आपला लेखी अर्ज तसेच तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन निर्धारित वेळेत बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here