कट्टा-पेंडूर रस्त्याच्या दुरवस्थेवरून वंदेश ढोलम यांची आमदार निलेश राणेंवर टीका

0
5
SEO Title: कट्टा-पेंडूर रस्त्याच्या दुरवस्थेवरून वंदेश ढोलम यांची आमदार निलेश राणेंवर टीका
SEO Title: कट्टा-पेंडूर रस्त्याच्या दुरवस्थेवरून वंदेश ढोलम यांची आमदार निलेश राणेंवर टीका

 कट्टा-पेंडूर रस्त्याच्या दुरवस्थेवरून वंदेश ढोलम यांची आमदार निलेश राणेंवर टीका

कट्टा :
कट्टा-पेंडूर-हुबळीचा माळ-काळसे हा प्रमुख जिल्हा मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर वारंवार अपघातही घडत आहेत. आमदार निलेश राणे यांना आमदार होऊन दोन वर्षे झाली, तरी हा रस्ता सुस्थितीत का होऊ शकला नाही, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पेंडूर विभागप्रमुख वंदेश ढोलम यांनी उपस्थित केला आहे.
या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असताना ग्रामस्थांना वारंवार मागणी करूनही रस्ता सुस्थितीत झालेला नाही. त्यामुळे नाईलाजाने कट्टा, पेंडूर आणि काळसे येथील ग्रामस्थांना पेंडूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन करावे लागले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचा धोकाही वाढला आहे, असे ढोलम यांनी म्हटले आहे.
हे आंदोलन पक्षविरहित पद्धतीने करण्यात आले होते. मात्र, सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट घेण्याचे साधे सौजन्यही दाखविले नाही, अशी टीका त्यांनी केली. ग्रामस्थांनी एकजुटीने आणि ताकदीने आंदोलन केल्यानंतर अखेर प्रशासनाने रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन दिले.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असेल, तर आमदार निलेश राणे यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचे आत्मपरीक्षण करावे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागणे ही गंभीर बाब असल्याचे वंदेश ढोलम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here