जनता विद्यामंदिर त्रिबंक येथे कोल्हापूर विभागीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ!

0
5
जनता विद्यामंदिर त्रिबंक येथे कोल्हापूर विभागीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ!
जनता विद्यामंदिर त्रिबंक येथे कोल्हापूर विभागीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ!

जनता विद्यामंदिर त्रिबंक येथे कोल्हापूर विभागीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ!

पाच जिल्ह्यांतील ३२ संघांचा सहभाग; खेळाडूंच्या क्रीडाकौशल्याला मिळाले व्यासपीठ

आचरा प्रतिनिधी :
जनता विद्यामंदिर त्रिबंक, ता. मालवण येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत. विविध जिल्ह्यांतील शालेय खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत, पंचायत समिती मालवणच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत, संतोष कोदे, सुरेंद्र सकपाळ, अशोक बागवे, प्रफुल्ल प्रभू, डॉ. मेहंदळे, अरविंद घाडी, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे, जिल्हा क्रीडाधिकारी मार्कंडेय धर्माई, शूटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय कदम, राष्ट्रीय पंच कोरगावकर, बबन गवस, दत्ताजी पवार आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
पाच जिल्ह्यांतील संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली आहे. शालेय स्तरावर खेळाडूंना स्पर्धात्मक खेळाची संधी मिळण्याबरोबरच त्यांच्यातील सांघिक भावना, शिस्त आणि क्रीडावृत्तीला प्रोत्साहन मिळणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जनता विद्यामंदिर त्रिबंकचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, माध्यमिक शिक्षण समितीचे पदाधिकारी तसेच आयोजकांनी विशेष मेहनत घेतली आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here