कोकणातील पूरग्रस्त भागात विविध महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनी समर्पित भावनेने केलेल्या कामाची दखल घेत आज चिपळूण येथे त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी, जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, खा. विनायक राऊत, आ.भास्कर जाधव,आ. शेखर निकम, जिल्हाप्रमुख सचिन कदम व संबंधित उपस्थित होते. चिपळूण वाशिष्ठी नदीवरील पुलाची आज खा.विनायक राऊत यांच्या समवेत पाहणी केली.त्याशिवाय गणेशोत्सव हा कोकणाचा सण लक्षात घेता गणपतीपुर्वी हा पूल सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.या पाहणीच्यावेळी सदानंद चव्हाणही उपस्थित होते.तसेच त्यांनी तिवरे – रिक्तोली – तिवडी – ओवळी ( रत्नागिरी ) या पूरग्रस्त भागाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी, खासदार विनायक राऊत,माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम व संबंधित अधिकारी उपस्थित होते.