टोकियो ऑलिम्पिकमधील चमकते तारे नीरज चोप्रा, रवी दहिया, बजरंग पुनिया, लवलिना बोर्गोहेन आणि टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकीपटू देशात परतले आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आले .ऑलिम्पिक स्टार्सचे स्वागत करण्यासाठी दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. या ऑलिम्पिक चॅम्पियन्सचे बँड-बाज्यासह स्वागत करण्यात आले.भारत माता की जयच्या घोषणा दिल्या जात होत्या. हे सर्व खेळाडू विमानतळावरून थेट अशोका हॉटेलमध्ये रवाना झाले आहेत.
दिल्ली विमानतळावर ऑलिम्पिकमधून परतलेल्या सर्व खेळाडूंवर RT-PCR आणि रॅपिड अँटीजन करण्यात आली. यानंतर सर्व खेळाडू अशोका हॉटेलकडे रवाना झाले. अशोक येथे ऑलिम्पिक संघाचे औपचारिक स्वागत करण्यात आले. भारतीय खेळाडूंनी यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली, जी आतापर्यंतची सर्वोच्च पदके आहेत. यापूर्वी 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 6 पदके जिंकली होती.
नीरज चोप्राने पहिल्यांदाच ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक आणि फ्री स्टाइल कुस्तीमध्ये रवी दहियाने 57 किलो वजनी गटात सिल्वर मेडल जिंकले. दुसरीकडे, भारतीय पुरुष हॉकी संघ, फ्रीस्टाइल कुस्तीच्या 65 किलो वजनी गटात बजरंग पुनिया, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि बॉक्सिंगमध्ये लवलिना बोर्गोहेन यांनी कांस्यपदके जिंकली.