देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो.केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 9 वा हप्ता जारी केला आहे. यावेळी योजनेअंतर्गत 9.75 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे 9.75 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 19,508 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा केला आहे. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात भाग घेतला होता.
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकर्यांना वर्षाला तीन वेळा 2-2 हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) मार्फत नोंदणी करू शकतात. याशिवाय या योजनेसाठी पटवारी, महसूल अधिकारी व राज्य शासनाने नेमलेले फक्त नोडल अधिकारीच शेतकऱ्यांची नोंदणी करीत आहेत. आतापर्यंत सुमारे 11 कोटी शेतकर्यांना याचा फायदा झाला आहे.