राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात आहे. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालय याप्रकरणी 20 ऑगस्ट रोजी आपला निर्णय देणार आहे. राज कुंद्राला 19 जुलै रोजी राज कुंद्राला अटक करण्यात आली. त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर फोर्ट कोर्टाने (एस्प्लेनेड कोर्ट) नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राज कुंद्रासह त्याचा आयटी प्रमुख रायन थोर्पे याच्या जामीन अर्जावरही 20 ऑगस्ट रोजी निर्णय दिला जाणार आहे.
पोलिसांनी न्यायालयाला असेही सांगितले की, त्यांच्याकडे राज कुंद्राविरोधात ठोस पुरावे आहेत आणि गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या कार्यालयातून 68 अॅडल्ट व्हिडिओ जप्त केले आहेत.यापूर्वी 28 जुलै रोजी किल्ला न्यायालयाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळली होती.