प्रतिनिधी पांडुशेठ साठम
स्वातंत्र्यदिन कार्यक्रम दिनाक :रविवार ,15/08/2021
शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव आणि पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वतंत्र दिनाचा 74 वा वर्धापन दिन समारंभ रविवार दिनाक 15 ऑगस्ट 2021 रोजी कोविड -19 च्या नियमांचे काटेकोर पालन करून साजरा करण्यात येणार आहे. शिरगाव हायस्कूल मधून एस एस सी परीक्षा 2021 मध्ये प्रथम आलेले कुमार स्वयम् तारक चव्हाण, यांचे हस्ते सकाळी ठीक 8.15 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे . आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.असे आवाहन मुख्याध्यापक. प्राचार्य शिरगाव हायस्कूल. पुं. अं कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव यांनी केले आहे.


