सिंधुदुर्ग–
रानभाज्यांचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहचवणे आणि त्यांची ओळख करुन देणे या उद्देशाने जिल्हा कृषी विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव 2021 चे 14 व 15 ऑगस्ट 2021 रोजी वासुदेवानंद सभागृह, उद्यमनगर, कुडाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 14 ऑगस्ट 2021 रोजी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे.
महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच पालकमंत्री उदय सामंत हे असणार आहेत. तसेच यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार बाळाराम पाटील, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे, यांच्यासह जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, कुडाळ पंचायत समिती सभापती नुतन आईर, उपसभापती जयभारत पालव आदी उपस्थित असणार आहेत. या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व रानभाज्यांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवास भेट द्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सिध्दन्ना म्हेत्रे त्यांनी केले आहे.


