भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धा

0
73

भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्न अमृत महोत्सवानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाच्या बाबीविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्हावे, ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळावा आणि समाजमनात त्याचे स्थान कायम रहावे, या उद्देशाने ज्ञान, प्रबोधनासाठी ही स्पर्धा 16 ऑगस्टपासून आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारला जाईल. स्पर्धकांनी या प्रश्नाचे उत्तर आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागाकडे ई-मेलद्वारा पाठवायचे आहे. [email protected] या ई-मेलवर स्पर्धकांनी उत्तर पाठवावे सर्वप्रथम योग्य उत्तर देणाऱ्या यशस्वी स्पर्धकाचे नाव शुक्रवारच्या बातमीपत्रातून प्रसारित करण्यात येतील. आकाशवाणीच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मदरही फोटोसह हे प्रकाशित करण्यात येईल. तसेच प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात येईल.

या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याच आवाहन आकाशवाणी मुंबईच्या वृत्तविभागप्रमुख सरस्वती कुवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here